प्रकल्प संचालक: श्रीनिवास काळे

प्रकल्प संचालक: श्रीनिवास काळे
प्रकल्प संचालक: श्रीनिवास काळे

01 January 2011

श्रीसंग कार्यकारी मराठी (श्रीकाम)
कंप्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज (संगणक भाषा)


प्रोग्रामिंग लँग्वेज (संगणक भाषा) म्हणजे काय?

     संगणकाने कसे वागावे हे त्याला ज्या शब्दांत सांगितले जाते त्यास संगणक भाषा असे म्हणतात. एकप्रकारे ती संगणकाशी संवाद साधण्याची भाषा असते.

     मराठी ही जशी आपली एकमेकांशी संवाद साधण्याची भाषा आहे तशी श्रीसंग कार्यकारी मराठी ही आपली संगणकाशी संवाद साधण्याची भाषा आहे.


प्रोग्रामिंग लँग्वेजचा (संगणक भाषेचा) उपयोग?

     संगणक भाषेचा उपयोग सर्वच क्षेत्रातील (जसे व्यवसायिक, वैज्ञानिक, औद्योगिक, शिक्षण, घरगुती, इ.) विविध संगणकीय कार्यक्रमसंबंधी गरजांची परिपूर्तता करण्यासाठी होतो. श्रीसंग कार्यकारी मराठीचा वापर करून या सर्व क्षेत्रांसाठी आता मराठी सॉफ्टवेयर तयार करण्याची मोठीच सोय झाली आहे.

व्यवहाराशी नातं

     प्रोग्रामिंग लँग्वेज अर्थात संगणक भाषेचे व्यवहाराशी अत्यंत घनिष्ठ असे नातं आहे. जगात जेथे जेथे लहान वा मोठ्या स्वरुपात संगणकाचा वापर होतो अशा प्रत्येक ठिकाणी लागणारे संगणक कार्यक्रम हे संगणक भाषेतूनच तयार होत असतात. उदा. तुमचा पीसी, मोबाईल, टीवी, वीडीओ गेम, डिजीटल कॅमेरा, एमपी3/4 प्लेयर, कार, विमाने, इ. या व अशा प्रत्येक ठिकाणी होणार्‍या संगणकाच्या वापरात संगणक भाषेवाचून पर्याय नसतो. वरील सर्व उपकरणे/वाहने यांचे नियंत्रण करणारे सर्व संगणक कार्यक्रम हे संगणक भाषेतूनच घडलेले असतात. संगणक भाषा आहे म्हणूनच तर या जगात संगणकाचा इच्छित ठिकाणी वापर शक्य होतो.

     श्रीसंग कार्यकारी मराठीमुळे हे सर्व मराठीतून घडवणे आता शक्य झाले आहे.
 
अमाप उत्पन्नाचं साधन

     प्रोग्रामिंग लँग्वेज अर्थात संगणक भाषेने जगातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे साधन म्हणून मिळवलेला नावलौकिक वादातीत आहे.

     अनेक व्यक्ती आणि कंपन्या तुमच्या गरजेनुसार सॉफ्टवेयर निर्मितीची सेवा देतात. त्यातील अनेक या जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत गणले गेले आहेत. ही सर्व सॉफ्टवेयर्स संगणक भाषेतूनच तयार होतात. या व्यवसायात संगणक भाषेच्या उत्पादनावर एकवेळ खर्च करावा लागतो. तर त्याचा वापर करुन बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक पटीने उत्पन्न मिळवता येते.


     श्रीसंग कार्यकारी मराठी अशा व्यवसायासाठी सशक्त साधन आहे.
 

3 comments:

Madhavi Joshi said...

mala avadale ,
khup chan .

Unknown said...

कंपायलर बनवला आहे का मराठीत?? आपले काम मला समजले नाही नीट..

Shrinivas Kale said...

श्रीसंग कार्यकारी मराठी (श्रीकाम) अंतर्गत मराठीतून कंपायलर,आयडीई, इ. साधने तयार केली आहेत. यांचा वापर करून आम्ही आता मराठी सॉफ्टवेयर आणि पोर्टेबल अप्लिकेशन तयार करून देतो.